loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप

आबलोली (संदेश कदम) - कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्ट विलेपार्ले व कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे यांच्या सहकार्याने गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील गरीब, गरजू, अभ्यासू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या, मेटल पाणी बॉटल, मेटल थर्मास यांसारख्या शालेय उपयोगी वस्तूंचा वितरण समारंभ नुकताच पाटपन्हाळे विद्यालयात संपन्न झाला. शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पाठपणना एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांना डायरी (दैनंदिनी) देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर शालेयपयोगी वस्तू वितरण समारंभासाठी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, मुख्याध्यापिका एस.एस.चव्हाण, रत्नागिरी जिल्हा कोकण कट्टाचे संपर्कप्रमुख सुमंत भिडे, शिक्षक आर.एम. तोडकरी, एस.एम.आंबेकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी पूजा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून कै.शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्ट विलेपार्ले व कोकण कट्टा यांच्यामार्फत पाटपन्हाळे विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे वितरण करून विद्यार्थी प्रेरणादायी उपक्रम राबवित असल्याने कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे, अध्यक्ष विवेक वैद्य, सचिव सुनील वनकुंद्रे, खजिनदार सजीत कदम व पदाधिकारी तसेच कै.शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्ट विलेपार्ले यांच्या विशेष सहकार्याबद्दल मुख्याध्यापिका एस.एस. चव्हाण यांनी आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg