आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात विद्यार्थिनी सक्षमीकरणासाठी स्वतंत्र फुलराणी कक्ष स्थापन करून नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सन २०२४ - २०२५ अंतर्गत किशोरवयीन विद्यार्थीनी सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक आरोग्यदायी मासिक पाळी व्यवस्थापनेच्या उद्देशाने माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरीमार्फत अनुसया महिला स्वयंसेवी संस्था रत्नागिरी यांच्या समन्वयाने स्वतंत्र फुलराणी कक्ष न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात नुकताच स्थापन करण्यात आलेला आहे.
फुलराणी कक्षामध्ये सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन, इन्सीनरेटर मशीन, लोखंडी कॉट, गादी, कव्हर सहित उशी, बेडशीट, सिलिंग फॅन, हिटिंग बॅग, केटल, प्रथमोपचार पेटी, मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी व पॅड वापराबाबतचा सजगता फलक इ.साहित्य फुलराणी कक्षामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. सदर साहित्याची स्टॉक बुकवर नोंद करण्यात आली आहे. या कक्षामध्ये विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून या फुलराणी कक्षाचे उदघाटन पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका सुजाता अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमासाठी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी , मुख्याध्यापिका एस.एस. चव्हाण, शिक्षिकावृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या. फुलराणी कक्ष स्थापन करून कार्यान्वीत केल्याबद्दल माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी व अनुसया महिला स्वयंसेवी संस्था रत्नागिरी यांच्या विशेष सहकार्याबद्दल मुख्याध्यापिका एस.एस.चव्हाण यांनी धन्यवाद दिले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.