loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरगाव शिंदेवाडीतील घटना: घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ

देवगड(प्रतिनिधी)- घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरती दिपक शिंदे(५०) रा.पनवेल व दिपक वसंत शिंदे(५२) रा.पनवेल या संशयित पती-पत्नी विरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै रोजी दुपारी ३ वा. सुमारास शिरगाव शिंदेवाडी येथे घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडीत महिलेचे माहेर शिरगाव शिंदेवाडी येथे आहे. पिडीत महिलेची आई मयत झाल्याने, ती शिरगाव शिंदेवाडी येथे राहण्यास गेली होती. आईचे दिवसकार्य सुरू असल्याने, सर्व नातेवाईक तेथे घरी आले होते. यावेळी संशयित आरती शिंदे हिने पिडीतेला ‘‘आईच्या मालकीचे घर मला हवे, तुम्ही येथून निघून जा,’’ असे सांगून वाद घातला तसेच संशयितेने पिडीतेच्या अंगावर धावत येवून, कुटुंबाला शिवीगाळ करून, ‘‘हात-पाय तोडून टाकेन’’, अशी धमकी दिली.

टाइम्स स्पेशल

तर संशयित दिपक शिंदे यांने पिडीता व तिच्या बहिणीच्या अंगावर धावत जावून, ‘‘तुम्हाला व कुटुंबियांना खपवून टाकेन’’, अशी धमकी दिली तसेच पिडीतेच्या मनात लज्जा निर्माण होईल, अशा शब्दात अश्लील शिवीगाळ केली. याबाबत पिडीतेने देवगड पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली असून, फिर्यादीनुसार, देवगड पोलिसांनी दोन्ही संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास महिला पोलिस हवालदार सविता लाड करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg