loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनम वांगचुक यांच्या अटकेचा गुहागर तालुका युवासेनेकडून निषेध, शृंगारतळीत जोरदार घोषणाबाजी, सह्यांच्या मोहिमेला प्रतिसाद

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी दिल्लीत उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांना केंद्र सरकारने अटक केल्याच्या निषेधार्थ गुहागर तालुका युवासेनेच्या वतीने गुरुवारी शृंगारतळी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. शृंगारतळी हायस्कूलच्या गेटसमोर मोठ्या संख्येने युवासैनिक, शिवसैनिक व विद्यार्थी एकत्र जमले. यावेळी "विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो", "छत्रपती शिवाजी महाराज की जय", भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो" अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोर्चादरम्यान केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामेसाठी सह्यांच्या मोहिमेत शेकडो विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेत सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या भूमिकेवर निषेध व्यक्त केला. "शिक्षण मागणाऱ्यांना तुरुंगात टाकणे ही हुकूमशाही आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या पाठीशी युवासेना खंबीरपणे उभी आहे," असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या निषेध मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महिला तालुका संघटिका सिद्धीताई सुर्वे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन जाधव, गुहागर तालुका युवासेना प्रमुख निनाद नार्वेकर, गुहागर शहर युवासेना शहर प्रमुख राज विखारे, गुहागर शहर महिला संघटिका सारिकाताई कनगुटकर तसेच गुहागर तालुका व गुहागर शहर महिला पदाधिकारी, गुहागर तालुका शिवसेना सर्वप्रमुख पदाधिकारी, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, युवासेना तालुक्यातील सर्व पदाधिकारी गुहागर शहर सर्व युवासेना पदाधिकारी, तमाम युवा सैनिक शिवसैनिक तालुक्यातील असंख्य नागरिक विद्यार्थी तालुक्यातील अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg