देवगड(प्रतिनिधी) - दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाविकास आघाडी, देवगडच्या वतीने गुरुवारी (दि. २३) सकाळी सुमारे ११ वाजता देवगड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच विविध मागण्यांचे निवेदन देवगड तहसीलदार यांना देण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा युवासेना प्रमुख सुशांत नाईक, देवगड तालुका युवासेना प्रमुख गणेश गावकर, तालुका प्रमुख रवींद्र जोगल, जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर, मनसेचे तालुकाप्रमुख संतोष मयेकर, स्वाती सावंत, हर्षा ठाकूर, नगरसेवक तेजस मामाघाडी, चंदन मेस्री, लक्ष्मण तारी दिनेश नारकर, गणेश कांबळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आंदोलनावेळी बोलताना सुशांत नाईक म्हणाले, देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाहीची प्रवृत्ती वाढत असून, विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले असताना, त्यांच्यावर लाठीचार्ज करणे ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.