loader
Breaking News
Breaking News
Foto

बापूसाहेब देसाई विद्यालयात 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत जनजागृती कार्यक्रम

तिलारी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील बापूसाहेब देसाई विद्यालय, उसप येथे गवस गुरुजी प्रतिष्ठान, उसप यांच्या वतीने 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून दोडामार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व, मोबाईलचा सुयोग्य व जबाबदारीने वापर तसेच विद्यार्थीदशेत घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी सुदृढ जीवनशैली स्वीकारून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी गवस गुरुजी प्रतिष्ठानचे मोहन गवस, बाबू गवस, दशरथ मोरजकर, राजन गवस, प्रेमनाथ गवस, विद्यालयाचे मुख्याध्यापक खांडेकर, पाडवी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मेमाणे, बाबणी बांदेकर आणि विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg