loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रतिपंढरपूरात आषाढी निमित्त विविध कार्यक्रम

सावंतवाडी : श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडीत आषाढी महाएकादशी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आला आहे. शनिवार २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वा. काकड आरती व महापूजा होणार असून पूजेचे मानकरी शेखर गुरुनाथ धारगळकर व नगरसेविका शर्वरी शेखर धारगळकर असणार आहेत. त्यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. सकाळी ११.३० ते २.०० श्री सद्गुरु संगीत विद्यालय यांचा गायनाचा सुश्राव्य भक्ती संगीताचा कार्यक्रम तर दुपारी २ ते ३ श्री कालिका देवी भजनी मंडळ कारिवडे यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ ते ४ महिला मंडळ सावंतवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ४ ते ६ पंडित योगेश बोरचाटे माणगाव यांचा सुश्राव्य संगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे कुरोली सिद्धेश्वर, सातारा यांचे कीर्तन होणार असून रात्री ९ नंतर श्रींचा पालखी सोहळा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवार सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह.भ.प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन, ९ नंतर श्रींची पालखी सेवा., सोमवार सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह.भ.प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन, मंगळवारी सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह.भ.प. सिद्धी मेस्त्री (ओटवणे) यांचे कीर्तन, बुधवारी सायंकाळी ६ ते ८ : कीर्तनकार कीर्तनभूषण ह.भ.प. हृदयनाथ गावडे (साळगाव) यांचे काला कीर्तन होणार आहे. भाविकांनी वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे मंदिर समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg