loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत ३१ जुलैपासून जिल्हा कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत ’दुसरी रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. टिळक आळी येथील वैद्य मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा रंगणार असून, शुक्रवारी ३१ जुलैला सकाळी ११ वा. स्पर्धेचे उद्घाटन होईल. या वर्षातील ही दुसरी जिल्हा मानांकन स्पर्धा आहे. ही स्पर्धा आठ गटांत खेळवली जाणार असून, त्यामध्ये पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, वयस्कर गट (पुरुष), कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट यांचा समावेश आहे. वयस्कर गटातील खेळाडूंना पुरुष एकेरीमध्येही सहभाग घेता येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका रविवारी २६ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आवश्यक स्पर्धा शुल्कासह तालुका प्रतिनिधींकडे जमा कराव्यात. तालुका प्रतिनिधी पुढीलप्रमाणे गुहागर - प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी - विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख - राहुल भस्मे (९६५७६३७६७८), मोहन हजारे (९४२२०५३९४३), चिपळूण - प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर - मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा - मनोज जाधव (७६२०११६७३६), खेड - योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर - मनोज सप्रे (९४०३७६८३७६), दापोली - माधव शेट्ये (९२०९७०९७९२) या स्पर्धेत कॅरम खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते आणि खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg