loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमधील धक्कादायक प्रकार: गैरहजेरीचे कारण देऊनही १२ वीच्या विद्यार्थ्याला तासाभर डांबले; पालकांचा संताप, शिक्षकांच्या निलंबनाची मागणी!

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - चिपळूणमधून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिरजोळी येथील 'नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज'मध्ये १२ वी कॉमर्सच्या सुफियान इम्रान घारे या विद्यार्थ्याला तब्बल एक तास कॉलेजमध्ये डांबून ठेवल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. आजारी असल्याने दोन दिवस सुट्टी घेतलेल्या सुफियानकडे पालकांनी लेखी अर्ज देऊनही मुख्याध्यापकांच्या आदेशाचे कारण पुढे करत या विद्यार्थ्याला डांबण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकारामुळे विद्यार्थ्याला प्रचंड मानसिक धक्का बसला असून, संबंधित शिक्षकांना निलंबित करेपर्यंत आपला लढा थांबवणार नाही, असा संतप्त इशारा सुफियानचे वडिल इम्रान घारे दिला आहे. सुफियानची मानसिक स्थिती बिघडली असून त्याला मोठा धक्का बसला आहे. "माझ्या मुलाने जर काही बरे-वाईट पाऊल उचलले, तर त्याला पूर्णपणे कॉलेज प्रशासन जबाबदार राहील," असा आक्रमक पवित्रा सुफियानचे वडील इम्रान घारे यांनी घेतला आहे.

टाईम्स स्पेशल

आज त्यांनी कॉलेज व्यवस्थापनाची भेट घेतली असता, व्यवस्थापनाने कारवाईसाठी ८ दिवसांचा वेळ मागितला आहे. मात्र, "कॉलेजने वेळ मागितला असला, तरी संबंधित शिक्षिका निलंबित होईपर्यंत मी माझा लढा कायम ठेवणार," असे इम्रान घारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. याप्रकरणी आता शिक्षण विभाग आणि प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg