loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत ट्रेलरचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

संगलट (इक्बाल जमादार) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील सुकेळी खिंडीतील तीव्र उतारावर आज, गुरुवारी 23 जुलै रोजी एक भीषण अपघात घडला. कोलाड बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रेलरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रेलर चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर (क्र. NL 01 AJ 0132) सुकेळी खिंडीच्या तीव्र उतारावरील अवघड वळणावर आला असता, अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटल्याने ट्रेलर रस्त्यातच महामार्गावर बंद पडला. ऐन महामार्गावर ही घटना घडल्यामुळे काही काळ वाहतुकीचा मोठा खोळंबा होऊन कोंडी निर्माण झाली होती.

टाईम्स स्पेशल

वाहतूक पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य राबवून आणि ट्रॅफिक पोलिसांच्या सहकायनि अपघातग्रस्त ट्रेलर रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला, त्यानंतर महामागविरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. अपघात अतिशय धोकादायक वळणावर घडला असला तरी चालकाला किरकोळ दुखापतीशिवाय मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg