दापोली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी दापोलीच्या वतीने "महारक्तदान संकल्प २०२६ " या नावाने रक्तदान शिबिराचा महत्वाचा आरोग्यविषयक उपक्रम आयोजित केला होता. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उस्फुर्त अशा दिलेल्या प्रतिसादामुळे भाजपाने आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चांगलाच सफल झाला. या रक्तदान शिबिरासाठी चिपळूण डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालयाची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने मोठे सहकार्य केले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते अशा या रक्तदान शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात दापोली तालुका भाजपाने आयोजित केलेले होते. या रक्तदान शिबिरात तालुक्याच्या अगदी ठिक ठिकाणच्या गावात राहणाऱ्या लोकांनी जोरदार पाऊस पडत असताना आणि शेतीची कामे सुरू असताना देखील मोठ्या संख्येने दापोलीत येवून रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला भाजपा तालुका कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र तसेच शासकीय रक्तपेढीकडून रक्तदान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या रक्तदान शिबिराला भाजपाचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास प्रोत्साहन दिले.
माजी आम. सुर्यकांत दळवी, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, नगरसेविका व तालुकाध्यक्षा जया साळवी, ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन होडबे, तालुका सरचिटणीस संदिप केळकर आदी पदाधिका-यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अजय कदम, विवेक भावे, योगेश सुर्वे, शहराध्यक्ष अतुल गोंदकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा वैष्णवी वेल्हाळ, विराज खोत, अमित जाधव, धिरज पटेल, प्रशांत पेठे, विष्णू पावसे, मिलिंद शेठ, उदय जावकर, अजय साळवी, अमोल तांबे, मयुरेश वेल्हाळ, ओंकार जोशी, प्रतेश आरेकर, ओंकार वेल्हाळ, दिपतेश खटावकर, राजेश पवार, जयवंत गोरीवले आदी पदाधिकारी तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन रक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्वी केला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.