मंडणगड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मंडणगड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने भिंगळोली जिल्हा परिषद मराठी शाळेला सौर ऊर्जेवरील पॅनल युनिट भेट देण्यात आले. कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. राकेश साळुंखे यांनी अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव करत, त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श युवकांसह संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी अजितदादा पवार यांच्या राजकारण व समाजकारणातील योगदानाचा गौरव करत, त्यांच्या जयंतीनिमित्त शाळेला सौरऊर्जा पॅनल भेट देऊन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांना हातभार लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक सुभाष सापटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, सुभाष शिगवण, मुख्याध्यापिका स्वप्नजा गावडे, शिक्षिका सुजाता पाडलेकर, शिक्षक गणेश पंदिरकर, सचिन चांदिवडे, बारगजे तसेच जिल्हा बँकेचे क्षेत्रीय सरव्यवस्थापक उदय कदम, व्यवस्थापक मनोज बोरजे, माजी व्यवस्थापक भाऊ पाडलेकर आदी. मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने प्रशालेतील नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने ऍड. राकेश साळुंखे यांनी अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या प्रेरणेने समाजकारण आणि राजकारण करत राहणार असून, त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण आठवडाभर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.