loader
Breaking News
Breaking News
Foto

नीट परिक्षा पेपरफुटी व दिल्लीतील आंदोलनावरील दडपशाहीविरोधात सोमवारी दापोलीत भव्य निषेध फेरीचे आयोजन; सर्व पक्षीयांनी दिले प्रांताधिका-यांना लेखी निवेदन

दापोली(प्रतिनिधी) : नीट पेपर फुटी संदर्भात जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर मंतर येथे बसलेल्या विद्यार्थ्यांवर त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करत त्यांच्यावर केंद्रशासनाने अमानुष पणे केलेल्या अन्वित अत्याचाराविरोधात तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या विदयार्थी हिताच्या न्याय मागण्यांच्या आमरण उपोषणावर झालेल्या अमानुष पोलीस दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यासाठी दापोलीत सोमवारी 27 जुलै 2026 रोजी एका भव्य निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील एक लेखी निवेदन दापोलीचे प्रांताधिकारी विजय सुर्यवंशी यांची भेट घेऊन सर्वपक्षीयांनी त्यांना दिले. महिन्याभरापासून दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनामाची मागणी करत विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनीही आमरण उपोषणाद्वारे पाठिंबा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संविधानाच्या चौकटीत सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आंदोलनात सहभागी झालेल्या विशेषतः मुलींवर अत्यंत निर्घृण आणि निर्दयीपणे अमानवी अत्याचार करत त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. ही बाब संविधानाचे उल्लंघन करणारी अशीच आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन हे काही राजकीय कारणासाठी नव्हते तर ते त्यांच्या न्याय्य हक्क आणि रास्त मागण्यांसाठी होतं मात्र पोलीसी बळाचा वापर करत विदयार्थी असतील नाहीतर त्यांना पाठिंबा देणारे असतील त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. नागरिकांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचा सरळ सरळ हा आत्मघात आहे तरी सुद्धा केंद्र सरकार केवळ बघ्याचीच भुमिका घेत आहे. जर त्यांचे आदेश नसते तर त्यांनी त्यात हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर कारवाई करत देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांवर असा बिलकुल प्रकार सहनच केला नसता. मात्र प्राथमिक दृष्ट्या केंद्र शासनाचाच या घटनेत हात आहे हे उघड सत्य दिसत आहे.

टाईम्स स्पेशल

अशा या अश्लाघ्य प्रकाराचा निषेध आणि विद्यार्थ्यांना पाठींबा दर्शविण्यासाठी दापोलीत शहरात सोमवार 27 जुलै 2026 रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास सर्व पक्षीय एक निषेध मोर्चा दापोली शहरातून काढण्यात येणार असून या निषेध फेरीची सुरुवात आंबेडकर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन करून करण्यात येणार आहे. ही निषेध फेरी आंबेडकर चौकातून पुढे दापोली बाजारपेठ मार्गे पोस्ट गल्लीतून तहसीलदार कार्यालयात येणार असून तहसीलदार यांना निवेदन देऊन या निषेध फेरीचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रांताधिकारी विजय सुर्यवंशी यांना निवेदन देताना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, राष्ट्रीय काँग्रेसचे दापोली तालुका अध्यक्ष मंगेश मोरे, सिराज रखांगे, मनसेचे तालुकाध्यक्ष नितीन साठे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे सचिन तोडणकर आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg