loader
Breaking News
Breaking News
Foto

पणदेरीत घरफोडी, ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास

दापोली (प्रतिनिधी) : पणदेरी येथे घरफोडी करून ३७ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याने पणदेरी परिसरातील गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पणदेरी महसुली गावातील एका घरातील ३७ हजाराचा मूद्देमाल कोणीतरी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात सुजाता संतोष भेकरे यांनी अज्ञात संशयीताच्या विरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासंदर्भात दाभोळ सागरी पोलिस ठाण्याकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीनुसार १६ जुलै ते १९ जुलै दरम्यानच्या कालावधीत फिर्यादी सुजाता संतोष भेकरे रा. पणदेरी यांच्या मालकीच्या घराचा मागिल दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने उघडुन आतमध्ये प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि मोत्याचे दागिने कोणत्यातरी हत्याराने फोडुन आतील तिजोरी खोलुन त्यामध्ये ठेवलेले ३२,७००/- रोख रक्कम व ५०००/- रुपये किंमतीची मोत्यांची नथ फिर्यादीच्या संमत्तीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्व:ताच्या फायद्याकरीता चोरुन नेलेल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

या घडलेल्या घटनेसंदर्भात सुजाता संतोष भेकरे (५६) रा. पणदेरी मराठवाडी यांनी दाभोळ पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात रितसर तक्रार दिली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास दाभोळ सागरी पोलिस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg