loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या माध्यमातून, गाव तिथे उद्योजक अभियान शुभारंभ

गेली 10 वर्ष कोकणातील सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या, शिव स्वराज्य फाउंडेशन संस्थेचा दशकपूर्ती सोहळा, खूप मोठ्या उत्साहाने, आनंदामध्ये आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी, सह्याद्री शिक्षण संस्था सभागृह, भांडुप (मुंबई) येथे पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये या संस्थेची स्थापना 2016 साली करण्यात आली. संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे. कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प.कोष्टी महाराज यांच्या वारकरी दिंडीने सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने ,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या माध्यमातून गाव तिथे उद्योजक अभियान राबवण्याची सुरुवात केली गेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच यावेळी समाजरत्न पुरस्कार ,कलागौरव पुरस्कार, उद्योगरत्न पुरस्कार आणि शिव स्वराज्य फाउंडेशन निर्मित कार्यकर्ता नाटकातील सर्व कलाकारांचा सर्वांचा सन्मान करण्यात आला. आणि आगामी मराठी चित्रपट एक होते माळीण चे प्रमोशन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या जीवनावर आधारित, एक होता कार्यकर्ता ह्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा, निर्माते डॉ.एम.एम.कुर्लगिरि यांनी केली. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री- यशवंत निकोसे,उत्तर प्रदेश, आमदार -सुभाष बने, लांजा /संगमेश्वर, बाळकृष्ण बने शेठ -उद्योजक, हास्यजत्रा कलाकार निखिल बने, wwpo चे जागतिक शांततादूत डॉ.एम.एम.कुर्लगिरि, दिलीप खानविलकर-उद्योजक, सचिन माजळकर -उद्योजक , महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उद्योग विचार मंच प्रमुख -रामेश्वर पवार, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे कार्यकारिणी सदस्य -संजय बगे, चित्रपट निर्माते संतोष म्हात्रे,समाजसेविका सुप्रिया सुजय धूरत,उद्योजक पराग बने, समाजसेवक सतीश जगताप ,चित्रपट निर्माते शरद दादा उगले ,वारकरी संप्रदायचे रमेश चव्हाण (माउलि), आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, कॉंक्रोटेक इंडियाचे धनबीर सिंग सुरी, आमदार अशोक पाटील-भांडुप, सुभाष बने -आमदार, सुजय धूरत-विधानसभा सचिव, भांडुप शिवसेना, उमेश माने -नगरसेवक, मुंबई मनपा., राजा गायकवाड -समाजसेवक, साक्षी दीपक दळवी -नगरसेविका, मुंबई मनपा, सोनल माजळकर यांनी विशेष सहकार्य केले. शिव स्वराज्य फाउंडेशनचे सल्लागार दिलीप खानविलकर, सल्लागार सचिन माजळकर, अध्यक्ष चंद्रशेखर धावणे, खजिनदार संदीप परब, कार्याध्यक्ष दिनेश पवार, संचालक- सुमेधा कदम, भिकाजी सावंत, किशोर सावंत, भालचंद्र वायंगणकर, निशा वायंगणकर, विनय पाटोळे, संदेश माजळकर, गुरुचरणजीत सिंग रंधावा, लक्ष्मीकांत कोलगे, तसेच सुनील घुमे, श्रीधर पवार, सीमा चव्हाण, अंजली तोंडवळकर, रोशन साखरे आणि भांडुप वारकरी संप्रदाय यांच्या विशेष सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg