loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोलीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप उत्साहात

दापोली, (चंद्रशेखर जोशी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ नुकताच विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या पन्नास वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करताना भविष्यकालीन प्रगतीचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे तसेच दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कुलगुरू डॉ. संजय भावे, डॉ. तानाजीराव चोरगे आणि डॉ. जयवंत जालगावकर यांनी सहकार, संस्थेची प्रगती आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. जीवन कदम यांनी संस्थेच्या पन्नास वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्प्यांची माहिती दिली. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष, माजी सचिव तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव सचिन मयेकर यांनी उपस्थित मान्यवर, सभासद आणि हितचिंतकांचे आभार मानले. ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेचे संचालक व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा सुवर्ण महोत्सवी समारोप संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg