खेड, (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी आंदोलकांनी सांगितले की, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत. स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीमुळे हजारो मेहनती विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. अशा घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करत, आंदोलकांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिसी कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असून, अशा दडपशाहीविरोधात युवक आता एकवटला असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
मोर्चादरम्यान शहरातील वातावरण घोषणांनी दणाणून गेले होते. अनेक नागरिकांनीही या आंदोलनाची दखल घेतली. पोलिसांनी मोर्चादरम्यान आवश्यक बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत ठेवण्याची व्यवस्था केली होती. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे किरण तायडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा लढा सुरूच राहील आणि अन्यायाविरोधातील आवाज अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.