loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका शिवसेनेच्यावतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिरराचे आयोजन

भरणे, (प्रतिनिधी): शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी एकादशीचे औचित्य साधून खेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार दि. २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजल्यापासून वारकरी संप्रदाय मठ भरणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समाजातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या शिबिरात नागरिकांची विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच मोफत औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमात JCI Khed व Lions Club khed City यांचेही सहकार्य लाभले आहे. परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg