loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे हायस्कूलचे प्रकाश कदम यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील एस. एन. कानडे आयडियल हायस्कूलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रकाश सिताराम कदम यांचा सेवापुर्ती आणि सदिच्छा प्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रकाश कदम हे देवळे हायस्कूलमध्ये भाऊ कदम या नावाने ओळखले जायचे. त्यांचे सुंदर अक्षर आणि निष्कलंक चारित्र्य, मनमिळाऊ स्वभाव प्रत्येकाला प्रेमानेच कोणताही सल्ला देणारे, मुलांशी प्रेमाने वागणारे, अशा या भाऊ कदम यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अनेक वक्त्यांनी त्यांच्या सुंदर अक्षराविषयी व वागण्याविषयी आणि शाळेला केलेल्या मदतीविषयी आपल्या मनोगतात आवर्जून सांगितले. त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्यासाठी संस्था अध्यक्ष निलेश कोळवणकर, कार्यवाह प्रबोध आटले, संस्था सदस्य यशवंत घागरे, प्रकाश चाळके, संतोष परशेटये, उत्सव मूर्ती व माजी सरपंच महोदया प्राची प्रकाश कदम आणि भाऊ कदम यांच्या मातोश्री शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

संस्थेच्या वतीने सन्मानपत्र व अध्यक्षांच्या हस्ते शाल, श्रीफळ तसेच मुख्याध्यापकांनी स्टाफच्या वतीने शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांची मनोगते, शिक्षकांची मनोगते इतर मान्यवरांची मनोगते व्यक्त करताना भावी आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद गार्डी यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg