loader
Breaking News
Breaking News
Foto

गव्हे येथे आठ फूट लांबीचा अजगर पकडला; WAR संस्थेचे सदस्य सर्पमित्र किरण करमरकर व जुई करमरकर यांची धाडसी कामगिरी

दापोली (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील गव्हे येथे बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बब्लू जोशी, पप्प्या जोशी आणि मिसाळ यांच्या घराशेजारी सुमारे आठ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वाईल्ड अ‍ॅनिमल रेस्क्यूअर (WAR) संस्थेचे सदस्य सर्पमित्र किरण करमरकर आणि त्यांची कन्या जुई किरण करमरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत शांतपणे, धाडसाने आणि कौशल्याने अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. त्यांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी अथवा अनर्थ घडला नाही आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पकडलेल्या अजगराला वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या धाडसी कार्याबद्दल ग्रामस्थांनी किरण करमरकर व जुई करमरकर यांचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांच्या तत्परतेमुळे गावातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पावसाळ्याच्या दिवसांत सापांचे दर्शन होण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत साप दिसल्यास घाबरून त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. त्वरित प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg