लांजा (वार्ताहर) : लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी २२ जुलै रोजी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी व उपकेंद्र तळवडे - कुरचुंब येथे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्या मनिषा लाखण, कुरचुंब सरपंच प्रसाद माने तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात डॉ. दिनेश काष्ठे यांनी राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच रक्त तपासणी, क्षयरोग तपासणी, डोळे तपासणी, ईसीजी आदींची तपासणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.
या शिबिरात रुग्ण तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली मिसाळ यांनी महिलांची तपासणी केली. तसेच एचपीव्ही लसीकरणाबाबत माहिती देवून ती लस महिलांना देण्यात आली. या शिबिराचा एकूण ९८ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत परगे यांनी आसगे जिल्हा परिषद गटातील कुरचुंब हे यशस्वीपणे शंभर टक्के पूर्ण एचपीव्ही लसीकरण झालेले पहिले गाव असल्याचे सांगितले.
दरम्यान, आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनुसार स्मार्ट सोलर संदर्भात जनजागृती व नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये गावातील अनेक ग्रामस्थानी सहभाग घेऊन नाव नोंदणी करून घेतली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.