loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर बस स्थानकावर अखेर ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड केंद्र सुरू; विभाग नियंत्रक ‘अश्वजीत जाणराव’ यांच्या तत्परतेचे व कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना विविध प्रवास सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी दिल्या जाणार्‍या ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डसाठी संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेची होणारी मोठी कोंडी आता अखेर फुटली आहे. संगमेश्वर बस स्थानकावर स्वतंत्र कार्ड नोंदणी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीचे संगमेश्वर तालुका निकम यांनी केली होती. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच, रत्नागिरी विभागाचे अत्यंत कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि अभ्यासू विभाग नियंत्रक अश्वजीत जाणराव यांनी याची तातडीने दखल घेतली. प्रवाशांचा प्रवास, हेलपाटे आणि होणारा आर्थिक अपव्यय थांबवण्यासाठी त्यांनी त्वरित प्रशासकीय आदेश जारी करत बुधवारपासून संगमेश्वर एसटी स्थानकातच एनसीएमसी कार्ड काढण्याची प्रत्यक्ष सुविधा सुरू केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अश्वजीत जाणराव यांनी एसटी महामंडळाच्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर नेहमीच विशेष भर दिला आहे. प्रशासकीय कामात गतिमानता आणणे, प्रवाशांच्या अडचणी थेट जाणून घेणे आणि त्यावर तत्परतेने उपाययोजना करणे ही त्यांची कार्यशैली राहिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांची समस्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. देवरुख केंद्रावरील गर्दीचा ताण आणि संगमेश्वर परिसरातील लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ संगमेश्वर बस स्थानकात नवीन केंद्र सुरू करण्यासाठी लागणारी तांत्रिक व प्रशासकीय तयारी पूर्ण करून घेतली. त्यांच्या या तत्पर आणि संवेदनशील निर्णयामुळे एसटी प्रशासनाची उंचावलेली प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

टाइम्स स्पेशल

संगमेश्वर बस स्थानकात बुधवारपासून हे स्वतंत्र केंद्र सुरू झाल्यामुळे तालुक्यातील पूर्व आणि उत्तर भागातील शेकडो गावांतील नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे. प्रवाशांचा देवरुखपर्यंतचा येण्या -जाण्याचा नाहक प्रवास खर्च पूर्णपणे वाचला असून गरिबांच्या पैशांची बचत होत आहे. आता स्थानिक पातळीवरच कार्ड मिळत असल्याने दिवसभर ताटकळत राहावे लागणार नाही आणि हेलपाटे मारण्यापासून कायमची मुक्ती मिळाली आहे. सवलतीचे कार्ड काढण्यासाठी आता दूरवर जावे लागणार नसल्याने वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थिनी आणि महिलांचा शारीरिक त्रास वाचला आहे. संगमेश्वर स्थानक हे नजीकच्या सर्व गावांशी जोडलेले असल्याने प्रक्रिया पूर्ण करून नागरिक आपल्या नेहमीच्या एसटीने सुरक्षितपणे घरी पोहोचू शकत आहेत. तसेच आता कामाची विभागणी झाल्यामुळे देवरुख केंद्रावरील अतिरिक्त भार हलका होऊन दोन्ही केंद्रांवर कार्ड वितरण अधिक वेगाने आणि सुरळीत पार पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg