loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील पुनस वरचीवाडी येथे चरायला सोडलेल्या बैलावर गवा गवारेड्याचा हल्ला

लांजा (संजय साळवी) - रानात चरावयाला गेलेल्या बैलावर गवारेड्याने हल्ला करून बैलाला गंभीर जखमी केल्याची घटना लांजा तालुक्यातील पुनस वरचीवाडी येथे बुधवारी २२ जुलै रोजी घडली. या घटनेमुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुनस येथील शेतकरी दिनकर गोपाळ चापडे यांनी आपली गुरे मनोज साळवी यांच्या आंब्याच्या बागेत चरायला सोडली होती. बुधवारी सकाळी या चरणार्‍या बैलावर गवारड्याने हल्ला केला. या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला. गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बैलाचे एक शिंग तुटले असून त्याच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. जखमी बैलावर पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश धुमाळे यांनी उपचार केले. दरम्यान, या घटनेने येथील शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg