loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती कदम यांचा शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या वतीने भव्य सत्कार

खेड - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेडच्या अध्यक्षा ज्योती रामदास कदम यांना राज्य शासनाचा महसूल व वन विभागामार्फत दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा २०२४ चा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. खेड तालुक्यातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. संस्थेचे संस्थापक व माजी कॅबिनेट मंत्री रामदासभाई कदम यांच्या सौभाग्यवती तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व संस्था उपाध्यक्ष सिद्धेशदादा कदम आणि गृहज्यमंत्री व संस्थेचे सहसचिव ना. योगेशदादा कदम यांच्या मातोश्री, संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रामदास कदम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थेच्या अध्यक्षा ज्योती कदम यांनी मंडणगड तालुक्यातील मौजे शिरगांव येथे “ज्योती निसर्ग बंधन वनराई” या उपक्रमातून एकूण १०५ एकर जागेवरील विविध प्रकारची फळझाडे, वनझाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती तसेच स्थानिक प्रजातींची मिळून सुमारे ७० हजार वृक्षांची लागवड केली आहे. गेल्या ६ वर्षांपासून सातत्याने वृक्ष लागवड करून वृक्ष लागवडीनंतर त्याचे संगोपन, संवर्धन आणि जैविविधतेच्या जतनावरही भर देत कोकणात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरात समृद्ध वनराई निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धन हा केवळ एक घटक नसून तो भावी पिढ्यांप्रती असलेली आपली सामाजिक जबाबदारी आहे. हा मोल्यवान विचार आपल्या कृतीतून जपत समाजात वृक्षसंवर्धनाचा संदेश रुजविण्याच्या आणि संतांच्या उक्तीनुसार “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या विचाराला सार्थ ठविण्याच्या संस्थेच्या अध्यक्षांच्या कार्याला सलाम !

टाईम्स स्पेशल

संस्था अध्यक्षा ज्योती कदम यांच्या पर्यावरणाप्रती असलेल्या समर्पित कार्याच्या गौरव प्रसंगी संस्थेचे खजिनदार काशिराम सकपाळ साहेब, संस्था संचलित योगिता डेंटल कॉलेजच्या सी.ई.ओ. व संस्था सदस्य डॉ. हेमांगी पोळ, छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूलचे प्राचार्य व संस्था सदस्य डॉ. खोत सर, डेंटल कॉलेजच्या डीन डॉ. वर्षा जाधव, लॉ कॉलेजच्या प्राचार्या बांद्रे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg