loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री बल्लाळ गणेश देवस्थान, प्रभानवल्ली येथे वृक्षारोपण उत्साहात

लांजा (सागर गोवळे) : न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा संचलित श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने, कै. काकासाहेब सरफरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री बल्लाळ गणेश देवस्थान, प्रभानवल्ली येथे नुकताच एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. निसर्गाचे जतन करणे आणि पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमादरम्यान देवस्थान परिसरात काजू कलमे आणि रक्तचंदनाच्या रोपांची लागवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल मराठे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) बहुसंख्य विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. दत्ताजी कदम, रविंद्र डोळस आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते, मंगेश जाधव, डॉ. भरत पाटील, अनिल चव्हाण, गुरु मासये, विक्रांत बेर्डे, परेश दळी, दिगंबर भिंगार्डे यांच्यासह प्रभानवल्लीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री बल्लाळ गणेश देवस्थानचे अध्यक्ष अमोल रेडीज आणि कार्यवाह वसंत पावसकर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, "अजूनही कोणत्याही संस्थेला, शासकीय यंत्रणेला किंवा व्यक्तीला देवस्थान परिसरात वृक्षारोपण करायचे असल्यास त्यांचे मनापासून स्वागत असेल." परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९६२३७३३७६६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान समितीमार्फत करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg