loader
Breaking News
Breaking News
Foto

साखलोली येथे गोमाता दिन उत्साहात संपन्न; देशी गायींच्या संवर्धनाचा संदेश

साखलोली (सागर गोवळे) - संजीवनी गटामार्फत साखलोली येथे 'गोमाता दिन' अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात देशी गायींच्या संगोपनाचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रकाश जामसुतकर आणि अनिकेत पडवेकर यांच्या गोठ्याला भेट देऊन देशी गायींच्या विधिवत पूजनाने करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपस्थित शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील प्रमुख देशी गायींच्या जातींची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये प्रत्येक जातीची वैशिष्ट्ये, दूध उत्पादन क्षमता, शेती व पशुपालनातील त्यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला. बदलत्या काळात देशी गायींचे संवर्धन व संगोपन करणे किती गरजेचे आहे, याबाबत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात साखलोली गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

टाईम्स स्पेशल

​हा यशस्वी कार्यक्रम कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला, ज्यामध्ये प्रामुख्याने डॉ. रमेश कुणकेरकर (सहयोगी अधिष्ठाता), ​डॉ. अशोक चव्हाण (रावे कार्यक्रम समन्वयक), ​डॉ. विजय देसाई (रावे केंद्र प्रमुख), ​डॉ. प्रसादे (विषय विशेषज्ञ), डॉ. आशिष शिगवण (कार्यक्रम अधिकारी), डॉ. प्रवीण झगडे (कार्यक्रम अधिकारी) या अधिकारी वर्ग लाभले. ​या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये देशी गायींचे संगोपन आणि त्यांच्या संवर्धनाबाबत मोठी जनजागृती निर्माण झाली असून, सर्वत्र या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg