loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकमान्य टिळक गिरणी कामगारांचे स्फूर्तीस्थान!

मुंबई - स्वातंत्र्य लढ्याचे प्रथम अध्वर्यू लोकमान्य टिळक यांना १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली इंग्रजांनी सहा वर्षाची‌ शिक्षा‌ ठोठावली, त्याच्या निषेधार्थ मुंबईतील गिरणी कामगारांनी गिरण्यांमध्ये सहा दिवस बंद पाळून इतिहास घडवला, अशा शब्दात राष्ट्रीय मिल मजूदर संघाच्या वतीने थोरदेशभक्त लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविं दराव मोहिते यांनी सुरू केलेल्या प्रथेप्रमाणे आज‌ ग्रंथालयामध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यातआली. खजिनदार निवृत्ती देसाई यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यावेळी निवृत्ती देसाई आपल्या भाषणात म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारून, जाज्वल्य क्रांतीचा लढा उभा केला. सहाय्यक सेक्रेटरी मोहन पोळ म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि ते मी मिळवणारच असे घोषित लोकमान्य टिळक यांनी केले. त्यांनी दैनिक केसरी व मराठा वर्तमानपत्रे सुरु केली आणि सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा सुरू करून स्वातंत्र्यलढा सामान्य माणसांच्या ‌घराघरापर्यंत नेला,संघटनेचे जनसंपर्क अधिकारी कथालेखक काशिनाथ माटल, ग्रंथपाल ममता घाडी आदींनी आपल्या भाषणात देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्तीच्या स्फूर्तींना उजाळा दिला. सेक्रेटरी शिवाजी काळे, सहकारी संस्थेचे महाव्यवस्थापक विलास डांगे आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg