loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीच्या नगराध्यक्षा ‘श्रद्धाराजे भोसले’ शिशुवाटिकेच्या बाल-वारकर्‍यांसोबत रमल्या

सावंतवाडी - भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा, या उद्देशाने विद्याभारती संचलित वसंत शिशु वाटिका या शिशुगाटिकेच्या मुलांची आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली होती. या दिंडीमध्ये वारकरी संत वारकरी यांच्या वेशभूषामध्ये शिशुनी उत्साहात सहभाग घेतला. माठेवाडा सावंतवाडी येथील शिशुवटीकेतून सुरू झालेली दिंडी ही उभा बाजार शिवाजी पुतळा गांधी चौक जयप्रकाश चौक ते विठ्ठल मंदिर अशी संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दिंडीमध्ये शिशुवाटिकेच्या सर्व दीदी पालक, शिक्षक समिती, व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुखुमाई चे दर्शन घेतल्यानंतर मुलांनी मंदिरामध्ये अभंग गायन व विठ्ठल नामाचा गजर केला. सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यासुद्धा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आल्या असता, शिशुवाटिकेच्या या वारकर्‍यांसोबत रमल्या. त्यांनी सर्व मुलांचे कौतुक केले व असे उपक्रम झाले पाहिजेत, असे सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg