loader
Breaking News
Breaking News
Foto

वनश्री पुरस्कार विजेत्या ज्योती कदम यांचा कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केला सन्मान

खेड (प्रतिनिधी) - पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि हरित महाराष्ट्र उभारणीत दिलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार ज्योती रामदास कदम यांना देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी डॉ. भावे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. वृक्षलागवड आणि पर्यावरण संरक्षणाच्या माध्यमातून ज्योती कदम यांनी उभारलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमुळे हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

सत्कार समारंभास माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रदीप सुर्वे, उपसभापती नम्रता तोडणकर, पंचायत समिती सदस्य नीलेश शेठ, स्वरूप महाजन तसेच कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg