loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभारवाडी गोळप सडा येथे सोन्याच्या अंगठ्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी - कुंभारवाडी गोळप सडा येथे घरातील बेडरुममधून सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्याप्रकरणी घरकाम करणार्‍या महिलेविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश शंकर साळवी (वय ६०, व्यवसाय-व्यापार, रा. गोळप कुंभारवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ०२ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून ते १० एप्रिल रात्री ९ वाजेपर्यंत फिर्यादी यांचे राहते घर, बेडरुम, कुंभारवाडी गोळप सडा येथे चोरीची घटना घडली आहे. २३ जुलै रोजी रात्री ७ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (क) नुसार घरकाम करणार्‍या संशयित सविता नरेंद्र गावडे (रा. कुंभारवाडी सडा, ता. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घरातील बेडरुममधील बेडवर काढून ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या संशयिताने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरल्या आहेत. ज्यामध्ये १० ग्रॅम वजनाची, नवग्रहाची सोन्याची अंगठी व १० ग्रॅम वजनाची, त्यावर आडव्या रेषा असलेली चौकोनी डिझाईनची सोन्याची अंगठी असा एकूण ८०,००० रुपयांचा माल चोरीस गेलेला आहे.

टाईम्स स्पेशल

फिर्यादी यांच्या घरी घरकामासाठी असणारी संशयित महिला सविता नरेंद्र गावडे हिला फिर्यादी आपली मुलगी मानत होते. ती स्वतःहून सोन्याच्या अंगठ्या परत आणून देईल, असा विश्वास वाटल्याने फिर्यादी यांनी पोलिसात खबर देण्यासाठी उशीर केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg