संगमेश्वर (सत्यवान विचारे) : विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव, कायद्याबद्दल आदर आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने संगमेश्वर पोलिसांच्या वतीने ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रचितगड माध्यमिक विद्यालय, कारभाटले येथे विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मितीश केणी होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच समाजातील बदलती आव्हाने समजून घेऊन सजग, जबाबदार आणि कायद्याचा आदर करणारे नागरिक बनण्याचे आवाहन केले.
‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ अंतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून सावधगिरी, वैयक्तिक माहितीची गोपनीयता तसेच अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश पोलिसांनी दिला.
कार्यक्रमात बालसुरक्षेबाबत ‘गुड टच-बॅड टच’ यातील फरक समजावून सांगण्यात आला. कोणताही अयोग्य अनुभव किंवा त्रास जाणवल्यास घाबरून न जाता तातडीने पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीशी संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विशेषतः मुलींसाठी स्वसंरक्षणाचे मूलभूत धडे देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत सजगता, आत्मविश्वास आणि धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस हवालदार चेतन उतेकर, किशोर जोयशी, महिला पोलीस हवालदार क्रांती सावंत, मुख्याध्यापक धनाजी बेंद्रे, सहशिक्षक व सूत्रसंचालक समीर अत्तार, धनाजी भांगे, चंदना बांबाडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दल आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. संगमेश्वर पोलिसांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.