loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत जाहीर निषेध

खेड (प्रतिनिधी) - देशभरात पेपरफुटी नावाखाली खोटी व चुकीची माहिती प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत जाहीर निषेध करण्यात आला. भाजपा नेते मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा शहराध्यक्ष नंदु साळवी, गटनेते (नगरसेवक) रहिम सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद (दादू) नांदगावकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल होळकर, शहराध्यक्ष स्वराज गांधी, मा. नगराध्यक्षा उर्मिलाताई शेट्ये पाटणे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा आशाताई सनगरे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, प्रशांत गमरे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम चौगुले, आनंद खेडेकर, वैजेश सागवेकर, बाळु वर्मा, विनायक शिरगावकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष संजीवनी शेलार, युवा मोर्चा उपाध्यक्ष अविराज मोरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष रूपेश तावडे, प्रदीप भोसले, विजय गुप्ता, अक्षय सनगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्या सह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg