loader
Breaking News
Breaking News
Foto

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात दापोलीत आरपीआय (आठवले)चा मोर्चा गगनचुंबी घोषणांनी दणाणला

दापोली (यशवंत कांबळे) -अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने शुक्रवारी दापोली शहरात गगनचुंबी घोषणांनी परिसर दणाणून सोडणारा निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढत आंदोलकांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोर्चादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचाही तीव्र निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच अनुसूचित जातींचे करण्यात आलेले 'अ, ब, क, ड' उपवर्गीकरण तात्काळ रद्द करून सर्व घटकांना समान न्याय द्यावा, अशी भूमिका आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. मोर्चाची सांगता दापोली तहसील कार्यालयात झाली. आरपीआयच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अर्चना घोलप यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

टाईम्स स्पेशल

शासनाने अनुसूचित जाती-जमाती समाजाशी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घ्यावेत, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चात आरपीआय (आठवले गट)चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, तालुकाध्यक्ष राहुल जाधव, अजित तांबे, उमेश पवार, रेश्मा नेवरेकर, दिनेश रुके यांच्यासह पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मोर्चा शांततेत पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg