loader
Breaking News
Breaking News
Foto

आषाढी एकादशी निमित्त पेठ पूर्णगड येथे रंगणार विविध कार्यक्रम

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - प्रती चद्रभागा समजणार्या मुचकुंदी नदिच्या काठावर वसलेल्या पूर्णगड गावात श्री विठ्ठल रखुमाई सेवा व महिला मंडळ धानबावाडी /सितापेवाडी पेठ पूर्णगड रत्नागिरी यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीचा उत्सव थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 5 वाजता काकड आरती, 7:30 वाजता श्री चक्रदेव यांच्यामंत्रघोषात श्रीची पूजा आरती, देवदर्शन व किशोरी सतीश सावंत मॅनेजिंग डायरेक्टर खंडाळा अर्बन बँक यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मूर्तीला चांदीचे मुकुट प्रदान, सकाळी 8 वाजता किर्तन सादरकर्ते ह. .भ प. प्रविण सावंतदेसाई त्या नतर भव्य दिंडी सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायंकाळी आरती तसेच माऊली महिला भजन मंडळ रत्नागिरी तसेच विठ्ठल रखुमाई वारकरी भजन व रात्रौ 10 वाजता महिला मंडळाच्यावतीने ग्रुप डान्स व महाराष्ट्र राज्यातील पहिले सादर करणारे आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी याच्या नमनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दि 26/ 7/2026 रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा व सायंकाळी 4 वाजता विठ्ठल रखुमाई महिला मंडळातर्फे विणा बळगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अक्षया शिवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी हळदिकुंकू समारंभ कार्यक्रम संपन्न होणार आहे.

टाईम्स स्पेशल

सायंकाळी आरती व श्री परशुराम प्रासादिक भजन मंडळ, पावस बुवा संजय पावसकर, तसेच श्री देव महापुरुष भजन मंडळ पूर्णगड रत्नागिरी यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्रौ 10 वाजता आभार प्रदर्शन व आई महालक्ष्मी प्रासादिक वारकरी दिडी भजन मंडळ ईळये, देवगड सिधुदूर्ग यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा, असे आवाहन या मंडळाचे अध्यक्ष योगेश डोर्लेकर व महिला अध्यक्षा आकांक्षा डोर्लेकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg