loader
Breaking News
Breaking News
Foto

अजितदादा पवार जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गुहागर तालुका आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. 29 जुलै 2026 रोजी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कीर्तनवाडी, भागडे विभाग येथील समाज मंदिरात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, औषधांचे वाटप, रक्ताच्या आवश्यक चाचण्या तसेच विविध आजारांवरील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय गरजेनुसार शस्त्रक्रियांसाठी नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरात ईएनटी, हर्निया, थायरॉईड, अपेंडिक्स, स्तनातील गाठी, महिलांच्या गर्भाशयाचे आजार, मूळव्याध, हायड्रोसिल, मोतीबिंदू, मणक्याच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा, कवटी तसेच अन्य आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियांसंदर्भात सल्ला दिला जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

तसेच पात्र नागरिकांना मोफत आयुष्मान भारत कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध असून त्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मंदार कचरेकर (96732 33190), आर्यन वराडकर (87674 50640) आणि सौरभ भागडे (77985 02866) यांच्याशी संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg