loader
Breaking News
Breaking News
Foto

केदार साठ़ेंची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती; दापोली तालुका भाजपाच्यावतीने सत्कार

दापोली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष आणि दापोलीचे सुपुत्र केदार साठे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. योग्य व्यक्तीची योग्य पदावर करण्यात आलेली नियुक्ती ही भाजपा पक्ष संघटन वाढीला अधिक बळ देणारी आहेच, शिवाय विकास कामांना गती देणारी आहे. त्यामुळे केदार साठे यांच्या जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्तीचे दापोलीत समाधान व्यक्त करण्यात येत असून या महत्त्वपूर्ण नियुक्तीबाबत दापोली तालूका भारतीय जनता पार्टी तर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आम. सुर्यकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी दापोली पंचायत समिती सदस्य श्रीराम उर्फ भाऊ इदाते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका आणि भाजपा तालुकाध्यक्षा जया साळवी, ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन होडबे, दापोली तालूका भाजपाचे सरचिटणीस संदिप केळकर, अजय कदम, विवेक भावे, योगेश सुर्वे, शहराध्यक्ष अतुल गोंदकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा वैष्णवी वेल्हाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विराज खोत, अमित जाधव, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस धिरज पटेल, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत पेठे, जेष्ठ कार्यकर्ते विष्णू पावसे, मिलिंद शेठ, उदय जावकर, अजय साळवी, शहर सरचिटणीस अमोल तांबे, मयुरेश वेल्हाळ, ओंकार जोशी, प्रतेश आरेकर, ओंकार वेल्हाळ, दिपतेश खटावकर, राजेश पवार, जयवंत गोरीवले आदी मान्यवर पदाधिकारी तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg