संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार केंद्र व राज्याच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी संस्कार विभाग यांच्या नियोजनाप्रमाणे सर्व तालुका शाखा यांच्या विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यात वर्षांवास धम्म प्रवचन मालिकेला प्रारंभ करण्याचे आदेश! आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या पवित्र वर्षावास काळात प्रत्येक विहारात वर्षा वास कार्यक्रमाचे होणार आयोजन! बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ ते सोमवार दिनांक २६.१०.२०२६ या कालावधीत सुरु होत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आयु.विजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आषाढ पौर्णिमा बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, सिव्हिल हॉस्पीटल जवळ रत्नागिरी येथे होणार आहे. जिल्हा व तालुका रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचा प्रारंभ केला जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अनंत सावंत जिल्हाध्यक्ष व सचिव संस्कार विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होत असून प्रमुख मार्गदर्शक प्रवचनकार एन.बी.कदम, तसेच आद, प्रदीप जाधव, अल्पेश सकपाळ, विकास पवार, विजय कांबळे हे असून प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष सुनिल पवार, राहुल मोहिते, सुभाष जाधव, आर.बी. कांबळे,जयरत्न कदम, विद्याधर कदम, अरुणकुमार मोरे,अनिल घाडगे, हर्षद जाधव तसेच संस्थेचे जिल्हा,तालुका पदाधिकारी, बौद्धाचार्य श्रामणेर, केंद्रीय शिक्षक/शिक्षिका तसेच सैनिक आणि उपासक/उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी अनेक विषयावर अनमोल असे मार्गदर्शन करण्यात करण्यात येणार आहे. १.बुधवार दि.२९.०७.२०२६ (आषाढ पौर्णिमा) विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध. २.रविवार दि.०२.०८.२०२६ भगवान बुद्धांचा कर्मसिध्दांत. ३.रविवार दि.०९.०८.२०२६ बौद्ध लेणी व स्तंभलेख - शिलालेख. ४.शनिवार दि.१५.०८.२०२६ (स्वातंत्र्य दिन) डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य. ५.रविवार दि.१६.०८.२०२६ तथागतांचा प्रतित्य समुत्पाद- कार्यकारणभाव-सिध्दांत. ६.रविवार दि.२३.०८.२०२६ सिबॉल ऑफ नॉलेज डॉ.बाबासाहेब आंबेडकर. ७.शुक्रवार दि.२८.०८.२०२६ (श्रावणपौर्णिमा) अनात्म व दुःख. ८.रविवार दि.३०.०८.२०२६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांती. लढे. ९.रविवार दि.०६.०९.२०२६ साकेत (अयोध्या) नगरीचा खरा इतिहास. १०.रविवार दि.१३.०९.२०२६ भगवान बुद्धांचे आरोग्य शास्त्र.
११.गुरुवार दि.१७.०९.२०२६ सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन, अनागरिक धम्मपाल व रामस्वामी पेरियार जयंती) निमित्त त्यांचे महान कार्य. १२.रविवार दि.२०.०९.२०२६ महाबोधी महाविहाराचा खरा इतिहास. १३.शनिवार दि.२६.०९.२०२६ (भाद्रपद पौर्णिमा) चार ब्रम्हविहार. १४.रविवार दि.२७.०९.२०२६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित महान ग्रंथ/ पुस्तके. १५.रविवार दि.०४.१०.२०२६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोधीसत्व कसे? १६.रविवार दि.११.१०.२०२६ माता रमाईचे अष्ठपैलू व्यक्तीमत्व. १७.रविवार दि.१८.१०.२०२६ बुद्ध धम्माची खास वैशिष्ट्य. १८.मंगळवार दि.२०.१०.२०२६ङ्गअशोका विजया दशमी - धम्म चक्र प्रवर्तन दिन. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती व ती गतिमान कशी करावी? १९.रविवार दि.२५.१०.२०२६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान. २०.सोमवार दि.२६.१०.२०२६ (अश्विन पौर्णिमा) बौद्ध धम्म आणि मानवता वर्षांवास समाप्ती. अशा अनेक विषयांवर अनमोल असे मार्गदर्शन करण्यात येणार असून या कालावधीत संपुर्ण जिल्ह्यातील कार्यक्रमांना बौद्धाचार्य, श्रामणेर, केंद्रीय शिक्षक/शिक्षिका,ङ्गसैनिक व तमाम बौद्ध बंधू - भगीनी,उपासक, उपासिका यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.