loader
Breaking News
Breaking News
Foto

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे पैसा फंड येथे नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकतेच नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न झाले. या शिबिराचा विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांना मोठा लाभ झाला. या शिबिरात डोळ्यांचे विविध आजार, चष्म्यासाठी नेत्र तपासणी करण्यात आली. यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या मेडिकल टीम मधील डॉ. कल्पेश आपटे, डॉ. अनिकेत माणकापुरे, दीप्ती सावंत, शिवानी लिंगायत, सिद्धेश सावंत तसेच संगमेश्वर तालुका जिजाऊ टीम प्रमुख राजेश धामणे, श्वेता पवार, मनोज पांचाळ, आदींनी सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेचे पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि नेत्रचिकित्सा शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी कोकणात सर्वतया संस्थेने आमच्या प्रशालेत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केल्याबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने प्रशालेत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केल्याबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेच्या वतीने जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना धन्यवाद दिले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg