loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरगाव कर्ले महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी ‘अन्नपूर्णा’तून विद्यार्थी कौशल्य विकास उपक्रमाचा शुभारंभ

देवगड(प्रतिनिधी) - शिरगाव कर्ले महाविद्यालयाने आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारे राबविलेला अन्नपूर्णा योजना हा उपक्रम विद्यार्थ्यांना स्वावलंबन, उद्योजकता आणि कौशल्य विकासाची प्रभावी संधी उपलब्ध करून देणारा आहे. उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्वयंरोजगाराची प्रेरणा निर्माण होईल, असे प्रतिपादन संस्थेचे संचालक अँड. प्रकाश जाधव यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित देवगड तालुक्यातील शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाचा ७ वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणांची सोय व्हावी, पालकांवरील आर्थिक भार कमी व्हावा, तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची परवड थांबावी म्हणून संस्थेने महाविद्यालयाची स्थापना केली.

टाइम्स स्पेशल

विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमातून महाविद्यालयाचा नावलौकिकात दिवसेंदिवस भर पडत आहे. संस्थेचे एज्युकेशनल हब उभारणीच्या स्वप्नाला सर्वानी सहकार्य करून बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधून, महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्यावतीने अन्नपूर्णा योजना या विद्यार्थी उद्योजकता व कौशल्य विकास उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg