loader
Breaking News
Breaking News
Foto

मोहोपाडा येथे शिवसेना (उबाठा) च्या नेतृत्वाखाली निदर्शने

रसायनी (राकेश खराडे) - दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या संविधानिक मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेचा निषेध करत वासांबे जिल्हा परिषद विभागातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या आदेशानुसार गुरुवार (दि.२३ जुलै) रोजी मोहोपाडा येथील शिवाजी चौकात निदर्शने करत बाजारपेठेतून भव्य निषेध रॅली काढण्यात आली." हुकूमशाही नाही चालणार", "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोहोपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), मनसे, आरपीआय, शेकाप तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंदोलनकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य व संविधानिक मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. यानंतर मोहोपाडा शिवाजी चौक ते प्रवेशद्वार अशी निषेध रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू," असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना (उबाठा) चे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा दीपिका भंडारकर, माजी सभापती रमेश पाटील, वासांबे जिल्हा परिषद सदस्य मंगेश पाटील, माजी सरपंच रोशन राऊत, माजी सरपंच निलम पाटील, माजी सरपंच भाग्यश्री पवार, माजी उपसरपंच दत्तात्रय जांभळे, अजित सावंत, ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा राऊत, प्रशाली खाने, सदस्या रसिका खराडे, वेदीका पाटील, माया पाटील, सुवर्णा मुंडे, मिनाक्षी पाटील, विभाग संपर्कप्रमुख अनिल पिंगळे, शहरप्रमुख निलेश जुनघरे, काँग्रेसचे युवा नेते निखिल ढवळे, समता सैनिक दलाचे विजय कांबळे, भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका उषाताई कांबळे, प्रकाशशेठ गायकवाड, बामसेफचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरुणकुमार गोरघाटे, रायगड सुजित सोनावळे, शैलेश सोनावणे, आशिष जाधव, अतुल दिघे यांच्यासह नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg