देवगड(प्रतिनिधी)- देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र ‘तारामुंबरी’ येथे ‘आषाढी एकादशी’ उत्सवानिमित्त शनिवार, दि. २५ व रविवार, दि. २६ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत काकड आरती, हरिनामाचा गजर, भजन, पालखी सोहळा तसेच महाप्रसादासह विविध आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
श्री विठ्ठल - रखुमाई मंदिरात पार पडणार्या या कार्यक्रमात शनिवार, दि. २५ जुलै रोजी पहाटे ब्राह्मणांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा होणार असून, त्यानंतर काकड आरती व वेदघोषाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. सकाळी हरिनामाचा गजर, सायंकाळी दिंडी भजन, विविध भजन मंडळांचे सादरीकरण, कीर्तन तसेच स्थानिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. २६ जुलै रोजी पहाटे काकड आरती व तीर्थप्रसादानंतर दुपारी श्रींच्या सेवेसह उत्सवाची सांगता होणार आहे.
या उत्सवाचे आयोजन अध्यक्ष विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, होडावडेरी मानकरी, तारामुंबरी यांच्या वतीने करण्यात आले असून, श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर व श्री देव आकार मंदिर, तारामुंबरी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडणार आहे. सर्व भाविक भक्तांनी देवदर्शनाचा लाभ घेऊन तीर्थप्रसादाचा स्वीकार करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.