loader
Breaking News
Breaking News
Foto

विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरचीवाडी येथै आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

मालवण (प्रतिनिधी) - आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरची वाडी येथे शनिवार, दि.२५ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा.- मंगेश आत्माराम साईल, सहाय्यक आयुक्त राज्यकर सहयुक्त व्यवसायकर विभाग, वस्तू व सेवाकर भवन, वांद्रे (पुर्व) यांच्या हस्ते शासकीय महापूजा, सकाळी १० ते १२ वा. जुने परंतु वापरण्यायोग्य असे कपड्यांचे संकलन करणे आणि संकलन झालेले कपडे अनाथ आश्रमाला दान करणे हा सामाजिक उपक्रम..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारी २.०० वा. रवळनाथ प्रफुल्ल भजन मंडळ, आडवली - भटवाडी यांचे सुस्वर भजन, दुपारी ३.०० वा. श्री जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ, पळसंब गावठाण व दुपारी ४.०० वा. भावई प्रासादिक भजन मंडळ, मालडी यांचे सुस्वर भजन, सायं. ५.०० वा. कीर्तनकार- ह.भ.प. आरती सुनिल बापट, नारिंग्रे हार्मोनियम साथ- विनोद परब, नारिंग्रे तबला साथ- सिद्धेश देवधर, हिंदळे यांचे किर्तन, रात्री ७.३० वा- श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, पळसंब (वरचीवाडी) यांचे दिंडी भजन असा विविधरंगी कार्यक्रम होणार असून भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब वरचीवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg