loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबेड बुद्रुक येथे अंतरा फाउंडेशनच्या माध्यमातून काजू कलम वाटप

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आंबेड बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे विविध कृषी विषयक उपक्रमांचे अंतरा फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत आयोजन केले होते. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत काजू फळपिक विकास योजनेतून मागेल त्याला काजू कलमे प्रकल्प राबविण्यात आला. आंबेड, मानसकोंड, कानरकोंड, कोळंबे, नावडी आदी गावातील 75 हुन अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या हस्ते काजू कलमांचे वाटप करण्यात आले. भात, नाचणी पीक विमा, महाविस्तार AI अँप, फार्मर आयडी आदी विषयी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबेड बुद्रुक येथे प्रक्षेत्रावर भात चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी शेतकऱ्यांना भात नियंत्रित लागवड, गिरीपुष्प पाल्याचा वापर, युरिया ब्रिकेड यांचे महत्व सांगितले आणि भात व नाचणी पीक विमा काढण्याबाबत आवाहन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर कांबळे, कृषी सहाय्य्क यादव, डोंबाळे, विमा सहाय्यक कांगणे, अंतरा फाउंडेशनच्या अध्यक्षा नुपुरा मुळ्ये, सचिव राजेश आंबेकर, उपाध्यक्षा सरिता आंबेकर, सीआरपी मेघना मोहिते, शेतकरी लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व महिलांनी गटाच्या माध्यमातून नव-नवीन व्यवसाय सुरु करून स्वावलंबी व्हावे याबत मार्गदर्शन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg