loader
Breaking News
Breaking News
Foto

सोशल मीडियावर जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आणि चिथावणीखोर पोस्ट वर कायदेशीर कारवाई करण्यासाठी लेखी निवेदन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - देशात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भरकटवण्यासाठी काही माथेफिरू प्रयत्न करत आहेत. सोशल मिडिया वाह्यात माहिती प्रसारित करण्यात कसलाही संकोच बाळगत नाहीत. या आंदोलनात फडकणारे निळे झेंडे या झेंड्याचा अर्थ जिहादाशी जोडणारी एक पोस्ट सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली आहे. या पोस्टला व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा उद्देश केवळ समाजात तेढ निर्माण करणे हाच आहे. आंदोलनात झळकणारे बॅनर, घोषणा आणि त्यानंतर आता झेंडे हे माथेफिरूंच्या डोळ्यात सलत आहेत. या माथेफिरूंच्या मेंदुत काहीतरी स्फोटक मनसुबे सजले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या माथेफिरूंचा शोध घेऊन समाजात असंतोष पेरणाऱ्या या वृत्तीला कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे. याच आशयाचे पत्र रोहित तांबे, संतोष जाधव आणि अन्य सहकाऱ्यांनी देवरूख पोलीस ठाणे यांना सुपूर्द केले आहे. या पत्रासोबत व्हायरल पोस्ट चे स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत. समाजात सलोखा राखणे ही आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तरीही जातीय तेढ निर्माण करुन सलोख्याचे संबंध विकोपाला नेण्यासाठी सक्रिय झालेल्या या माथेफिरूंना वेळीच रोखले पाहिजे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg