loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये 'कृतज्ञता मेळावा'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

पनवेल (प्रतिनिधी) - मातीची सेवा करणारा, निसर्गाचे रक्षण करणारा आणि देशाला अन्नधान्य पुरवणारा बळीराजा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, वीजबिल माफी तसेच विविध कृषी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे ऐतिहासिक निर्णय घेतले असून त्याबद्दल संपूर्ण शेतकरी समाज सरकारप्रती कृतज्ञ आहे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी येथे केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी उत्तर रायगड जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या 'कृतज्ञता मेळाव्या' प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या मेळाव्याला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस व पनवेल महापालिकेचे सभागृहनेते ऍड. प्रकाश बिनेदार, दिपके बेहेरे, पनवेल पंचायत समितीच्या रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर सांगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

आपल्या भाषणात नामदार आशिष शेलार म्हणाले की, शेतकरी हा माती आईची सेवा करणारा खरा कर्मयोगी आहे. त्याच्या कष्टातून शेतात सोने पिकते आणि त्याच उत्पादनाच्या विक्रीतून तो आपल्या कुटुंबाचा वर्षभराचा उदरनिर्वाह करतो. मात्र दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे अशा कठीण काळात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे आणि हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनानेही त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे. या केवळ घोषणा नसून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg