loader
Breaking News
Breaking News
Foto

संवेदना फाउंडेशन मुंबईतर्फे लाटवण पंचक्रोशी विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मंडणगड(प्रतिनिधी)- लाटवण येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित, लाटवण पंचक्रोशी विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना संवेदना फाउंडेशन मुंबईतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप, दिव्यांगांना उपकरणांचे वाटप आणि वृक्षारोपण अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकीचे भरगच्च कार्यक्रम संवेदना फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष विनोद चाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार सुर्यवंशी, स्वाती चव्हाण, संजय सोंडकर आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई येथील संवेदना फाउंडेशनतर्फे मंडणगड तालुक्यातील विविध शाळांमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेली अनेक वर्ष सातत्याने शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी सारखे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात तसे या वर्षी ही तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयासह ३ महाविद्यालयात तसेच ८ हायस्कूलमध्ये, त्याचप्रमाणे घराडी येथील अंध विद्यालयात शैक्षणिक साहित्य आणि वृक्षारोपणाचा महत्वाचा कार्यक्रम पार पडला. त्यात लाटवण पंचक्रोशी विद्यामंदिर शाळेतील दिव्यांग विद्यार्थी विघ्नेश पवार याला ’कमोड खुर्ची’ तर आकांक्षा सुतार हिला ’श्रवण यंत्र’ प्रदान करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ घोसाळकर यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg