loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव येथे डॉक्टर ‘अनिकेत निब्रे’ यांनी साकारली ६० फुट उंच आकर्षक विठ्ठलमूर्ती

सावंतवाडी - आषाढी एकादशीचे औचित्य साधून माजगाव येथे डॉक्टर ‘अनिकेत रविंद्र निब्रे’ यांनी आपल्या शेतात तब्बल ६० फुट उंच भव्य विठ्ठलमूर्ती साकारली आहे. निसर्गपूरक साहित्याचा वापर करून, साकारलेली ही मूर्ती परिसरात विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ही भव्य विठ्ठलमूर्ती तयार करण्यासाठी ओहळातील दगड तसेच विविध प्रकारची पाने आणि फुलांचा उपयोग करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीला अत्यंत आकर्षक आणि सुंदर वस्त्रालंकारांनी सजवण्यात आले आहे, ज्यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही विठ्ठलमूर्ती साकारण्यासाठी डॉक्टर अनिकेत निब्रे व त्यांचे मित्र चिरायू अशोक वारंग यांनी विशेष मेहनत घेतली. सुमारे आठ दिवसांच्या अखंड परिश्रमानंतर ही भव्य मूर्ती पूर्ण झाली. या उपक्रमात त्यांना रविंद्र निब्रे, ऋतिका निब्रे, प्रशम वारंग आणि अनिशा वारंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आषाढी एकादशीनिमित्त साकारण्यात आलेल्या या ६० फुट उंच विठ्ठलमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उत्सुकता दाखवत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg