खेड, दि. २४ जुलै २०२६ : अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), खेड तालुक्याच्या वतीने खेडचे तहसीलदार सुधीर सोनावले यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. संविधानाने अनुसूचित जाती समाजाला दिलेल्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे आणि सामाजिक न्याय अबाधित राहावा, अशी ठाम भूमिका यावेळी पक्षाच्या वतीने मांडण्यात आली.
निवेदन देण्यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या रक्षणाचा संकल्प करत निदर्शनांना सुरुवात झाली. “जय भीम!”, “जय संविधान!”, “एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करा!”, “उपवर्गीकरण नको—संविधान वाचवा!”, “सामाजिक न्यायाचा विजय असो!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.यानंतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी शिस्तबद्ध मोर्चाच्या स्वरूपात तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार सुधीर सोनावले यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर केले.यावेळी कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अनुसूचित जाती समाजाला मिळालेले आरक्षण हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिलेले घटनात्मक संरक्षण आहे. या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास समाजामध्ये कृत्रिम विभागणी निर्माण होऊन सामाजिक ऐक्याला धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने संविधानाची भावना, सामाजिक न्याय आणि सर्व घटकांचे हित लक्षात घेऊनच कोणताही निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तहसीलदार सुधीर सोनावले यांना निवेदन देताना खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे पदाधिकारी, गटप्रतिनिधी, समाजबांधव तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंदार हळदे (तालुकाध्यक्ष, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ), सुशांत भाई सकपाळ (कोकण प्रदेश युवक अध्यक्ष), चंद्रसेन मोहिते (सरचिटणीस, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ), गौतम तांबे (खेड तालुका अध्यक्ष), सुरेंद्र तांबे (रत्नागिरी जिल्हा पर्यावरण अध्यक्ष), जितेंद्र तांबे (खेड तालुका सरचिटणीस), विकास दुत्रे (युवक खेड अध्यक्ष), गणेश शिर्के (युवक जिल्हा संपर्क प्रमुख), मिलिंद तांबे (रिपब्लिकन नेते), गौतम लघु तांबे (रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख), दिपेंद्र जाधव (खेड शहर अध्यक्ष) यांच्यासह बौद्ध समाज सेवा संघाचे पदाधिकारी, सी. आर. कांबळे, वामन तांबे, मोतीराम जाधव, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, गाव शाखांचे पदाधिकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.