loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने'ची यादी जाहीर; लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य

रत्नागिरी, -​पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी (दि. २४ जुलै २०२६) प्राप्त झाली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित अग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी केले आहे. ​कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी खालील ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे: ​संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, ​संस्थेचे सचिव

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अग्रीस्टॅक फार्मर आयडी (Agristack Farmer ID): कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी हा आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा आयडी नाही किंवा ज्यांची नोंदणी झालेली नाही, त्यांनी जवळच्या 'आपले सरकार' किंवा 'सीएससी' (CSC) केंद्रावर जाऊन तात्काळ अग्रीस्टॅक नोंदणी करणे बंधनकारक आहे.​आधार प्रमाणीकरण: यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार किंवा CSC केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे.

टाइम्स स्पेशल

आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया आणि त्यासंबंधीची सविस्तर माहिती जिल्ह्यातील सर्व आपले सरकार/CSC केंद्रे तसेच बँकेच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी कोणतीही रक्कम देऊ नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री कुलकर्णी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg