loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णै-पाज पंढरी मार्गाची दुरवस्था; अपघाताची टांगती तलवार

दापोली | प्रतिनिधी | दि. २६ दापोली तालुक्यातील हर्णै मच्छी मार्केट शेजारी पाज-पंढरीकडे जाणारा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, दुचाकीस्वार, पादचारी तसेच मच्छी व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची वास्तविक अवस्था लक्षात येत नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दापोली तालुका मंडळ उपाध्यक्ष पांडुरंग पावसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हर्णै मच्छी मार्केट परिसर हा दापोली तालुक्यातील महत्त्वाचा व्यापारी व वाहतूक मार्ग असून या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, मच्छी विक्रेते, व्यापारी आणि पर्यटकांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर चिंता निर्माण करत आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही अनेक वेळा या प्रश्नाकडे लक्ष वेधले असले तरी अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

भाजपचे तालुका मंडळ उपाध्यक्ष पांडुरंग पावसे म्हणाले,"हर्णै-पाज पंढरी मार्ग हा स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. कोणतीही जीवितहानी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने जबाबदारीने कारवाई करणे आवश्यक आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg